Adsense


⚡ आगामी महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान रंगणाऱ्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजचा संघ एका विशेष विमानाने इंग्लंडकडे रवाना झाला आहे. 

👨‍🔬 रवाना होण्यापूर्वी वेस्टइंडीजच्या सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली असून सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

🗣️ विंडीज बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मँचेस्टर येथे वेस्ट इंडीजचा संघ पोचल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर या दौऱ्याला सुरुवात होईल.

⚔️ मालिकेतील 3 कसोटी सामने खुल्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.

● पहिला कसोटी सामना : 8 जुलै (साऊथम्पटन)
● दुसरा कसोटी सामना : 16 ते 20 जुलै
● तिसरा कसोटी सामना : 24 ते 28 जुलै  (ओल्ड ट्रॅफर्ड)

🧢 वेस्टइंडीजचा संघ : जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, नक्रुमा बोनर, क्रॅग ब्रॅथवेट, शमर ब्रूक्स, जॉन कँपबेल, रोस्टन चेज, रकीम कॉर्नवाल, शेन डाउरिच, केमार होल्डर, शाई होप, अल्जारी जोसेफ, रेमन रीफर आणि केमार रोच.

🧢 राखीव खेळाडू : सुनील अंबरीस, जोशुआ डासिल्वा, शॅनन गेब्रियल, कीन हार्डिंग, काइल मेयर, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्क्विनो मिंडले, शाइनी मोसले, एंडरसन फिलिप, ओशेन थॉमस आणि जोमेल वार्रिकान.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post