Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : कामात जैसे थे परिस्थिती राहील. काही जबाबदार्‍या नव्याने वाढतील. आवडी निवडीबाबत आग्रही राहाल.

2. वृषभ : सर्वांशी तोंडात साखर ठेवून वागाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चार चौघात मिळून मिसळून वागाल.

3. मिथुन : वरिष्ठांच्या सल्ल्याने तजवीज करावी. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तसेच काही खर्च देखील वाढतील.

4. कर्क : कामाचा आवाका लक्षात घ्या. क्षुल्लक गोष्टींमुळे कामे रेंगाळू शकतात. अडथळ्यातून प्रयत्नाने मार्ग काढावा.

5. सिंह : तरूणांशी मैत्री वाढेल. त्यांचे नवीन विचार जाणून घ्याल. बरेच दिवसा नंतर जुने मित्र भेटतील.

6. कन्या : एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

7. तूळ : कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीकडून मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.

8. वृश्चिक : जुने प्रश्न मार्गी लावाल. कामाचा ताण वाढू शकतो. वडीलधार्‍यांचा विरोध सहन करावा लागेल.

9. धनु : सामाजिक गोष्टींचे भान राखावे लागेल. प्रामाणिक प्रयत्नांना आपलेसे कराल. फटकळपणे बोलणे टाळा.

10. मकर : कामातील ऊर्जा वाढेल. चिकाटी कमी पडू देऊ नका. सारासार विचाराने उलाढाल करा. एकमेकांचे विचार जाणून घ्याल.

11. कुंभ : घरात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक सुखसोईंकडे विशेष लक्ष द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाता येईल.

12. मीन : प्रवासाची आवड भागवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाद्य शिकायला सुरवात करावी.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post