Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल.

2. वृषभ : नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात.

3. मिथुन : दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल.

4. कर्क : कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात.

5. सिंह : नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील.

6. कन्या : आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल.

7. तूळ : दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील.

8. वृश्चिक : मानसिक चंचलता जाणवेल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल. भागीदारीत गुंतवणूक कराल.

9. धनु : संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल.

10. मकर : कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

11. कुंभ : समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा.

12. मीन : निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post