Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in1. मेष : कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आवडते खाद्यपदार्थ खाल. सामाजिक कार्याबद्दल मनात ओढ निर्माण होईल.

2. वृषभ : तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. मनातील जुनी हौस पूर्ण कराल. सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेतून पहाल.

3. मिथुन : क्षणिक आनंदाच्या गोष्टी कराल. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील.

4. कर्क : व्यवसायातून चांगली कमाई करता येईल. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. पि‍छेहाटीला घाबरून जाऊ नका.

5. सिंह : औद्योगिक वातावरण चांगले राहील. तुमच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

6. कन्या : विशाल दृष्टीकोन बाळगावा. तुमच्या कलेला चांगला वाव देता येईल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.

7. तूळ : कमी श्रमात कामे करण्याकडे कल राहील. वारसाहक्काच्या कामांना गती येईल. सासुरवाडीची मदत घेता येईल.

8. वृश्चिक : एकमेकांचे विचार जाणून घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराची कर्तव्यदक्षता दिसून येईल.

9. धनु : सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील अशी अपेक्षा ठेऊ नका. काही गोष्टींना मुरड घालावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे.

10. मकर : आवडत्या व्यक्तीच्या सहवासाची ओढ वाढेल. प्रेमभावना वाढीस लागेल. नवीन ओळखी वाढतील.

11. कुंभ : कौटुंबिक बाबतीत समाधानी असाल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल.

12. मीन : साहित्याची आवड जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post