Adsense


पुणे जिल्हयातील ३५ हजार ५२८ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित २१ हजार ४११  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तसेच ॲक्टीव रुग्ण संख्या १३ हजार १३२ आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ९ हजार ७७०, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २ हजार ६३६ व कॅन्टोंन्मेंट ९१, खडकी विभागातील ६०, ग्रामीण क्षेत्रातील ५२२, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील ५३ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित एकूण ९८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 यामध्ये पुणे महानरगपालिका क्षेत्रातील ७९६ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ९४, पुणे कॅन्टोंमेन्ट २५, खडकी विभागातील १३, ग्रामीण क्षेत्रातील ३७, जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील २० रुगणांचा समावेश आहे.

तसेच ५५७ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण६०.२७ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.७७ टक्के इतके आहे. पुणे जिल्ह्यात १ हजार ९२१ नवे रुग्ण आढळले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post