Adsenseकोरोना तू ना देवासारखा आहेस
कुणाचा तुझ्या असण्यावर विश्वास आहे, कुणाचा नाही
कुणाला तुझी प्रचिती येते कुणाला नाही
कुणाला प्रचिती येऊन देखिल तुझे आस्तित्व मानायचे नाही
खरच, कोरोना तू ना देवासारखा आहेस

 देवाची म्हणे 33 कोटी रुपे
कोरोना म्यूटेट होऊन म्हणे तुझी देखिल अनंत रुपे ?
ईश्वर म्हणे चराचरात आहे
कोरोना, म्हणे तू देखिल चराचरात आहेस ?
खरच, कोरोना तू ना देवासारखा आहेस

कुणी म्हणतं पूजाअर्चा करुन देव भेटतो
कुणी म्हणतं  उपास तापास करुन तो भेटतो
कुणी म्हणतं  यज्ञ याग, तपश्चर्या करुन देव भेटतो
कोरोना तुझे देखिल तसेच आहे म्हणे ?
कुणी म्हणतं तू स्पर्शातून येतोस
कुणी म्हणतो तू हवेतून येतोस
कुणी म्हणतो तू ना एक नुसतीच पसरविलेली भिती आहेस
कुणी म्हणतो घरात थांबा, म्हणजे तू भेटणार नाहीस
कुणी म्हणतो बाहेर पडा, तुझ्यात काही जास्त दम नाही

कुणी म्हणतं तुझ्यावर काहीच औषध नाही,

कुणी म्हणतं आयुर्वेद, होमिओपथी ने तू पळतोस

कुणी म्हणतं अलोपथी ने तू पळतोस
खरच, कोरोना तू ना देवासारखा आहेस


पण कोरोना देव म्हणे तारक असतो
आणि तू म्हणे संहारक आहेस?
कोण आहेस कोण तू कोरोना ?
तू खरच आहेस का नाही आहेस ?
खरं काय आहे कोरोना ,
ते तुझ्याबद्दल फक्त तुलाच माहिती
अगदी जसे ते देवाबद्दल फक्त देवालाच माहिती
खरच, कोरोना तू ना देवासारखा आहेस


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post