Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


तू कुणी नव्हतासच माझा 
मीच उगा जवळ आले होते 

भेगाळल्या भुईला वाटलं, मृगाचा पाऊस 
पण तू होतास मृगजळ 

केला प्रयत्न मी, तुला विसरायचा 
नंबरही काढून टाकला होता, मोबाईल मधून एक दिवसाचा 

हसले तर तुला सांगतेच 
दुखले, तर मात्र तुला सांगायची सोय नाही 

एवढ्यात विसरलास 
सोबत चाललेले उन्हाळे, पावसाळे 
चोखलेले आंबे आणि मावळतीचे बगळे 

ठीक आहे तू स्थितप्रज्ञ 
आणि मी वेडी राधा 
पण कधीतरी तुझं मन सुद्धा कातर होत असेल ना 

मला विसर म्हणताना 
रोज मथुरेच्या वाटेकडे, डोळे लावून पाहताना 
माझ्या काळजाचं होणारं पाणी 
आर्त साद घातलेली गाणी 
तुझ्यापर्यंत पोहोचतच नसतील 

का, तू कुणी नव्हतासच माझा ?
मीच उगा जवळ आले होते 

- मधुकर धुरी 

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post