Adsense


Credit ANI

तिरुवनंतपुरम -
सोशल मीडियावर सध्या एका ट्रकचा फोटो व्हायरल  झाला आहे. 38 चाकाच्या  ट्रकमध्ये 78 टनाचं एअरोस्पेस क्षैतिज ऑटोक्लेव (Aerospace horizontal autoclave)   आहे. 78 टन वजन घेऊन हा ट्रक महाराष्ट्रातून गेल्यावर्षी निघाला होता. तो केरळमध्ये 19 जुलैला पोहोचला आहे. तिरुवनंतरपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 4 राज्यांमधून 1700 किमी प्रवास करत पोहोचणार आहे. एएनआय न्यूज एजन्सीने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. ट्रकचे फोटोही पोस्ट करण्यता आले आहेत.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुवनंतपुरम इथं असलेल्या विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) अंतराळ केंद्रात डिलिव्हरी देण्यासाठी एक एअरोस्पेस क्षैतिज ऑटोक्लेव्ह  (Aerospace horizontal autoclave) घेऊन महाराष्ट्रातून एक ट्रक गेल्या वर्षी 9 जुलै 2019 ला निघाला होता. तो ट्रक वर्षभराने तिरुवनंतरपुरम (Thiruvananthapuram) इथं पोहोचणार आहे. कर्मचाऱ्यांनीसुद्धा अशी माहिती दिली की, जुलै 2019 मध्ये सुरु झालेला प्रवास 4 राज्यांमधून आज केरळमध्ये पोहचेल अशी आशा आहे.

78 टन वजन घेऊन जाणाऱ्या ट्रकची सुरक्षाही महत्वाची होती. तसंच वाटेत येणाऱ्या अडचणी पार करत इतर वाहतुकीला अडथळा येणार नाही याचीही काळजी घ्यावी लागत होती. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रकसोबत एक पोलिस गाडीही असायची. फक्त हा ट्रक कोणत्याही अडचणींशिवाय पोहोचावा यासाठी ज्या मार्गाने जाणार होता त्या रस्त्याची दुरुस्तीही करण्यात आली. रस्त्यात आडव्या येणाऱ्या झाडांच्या फांद्या, वीजेचे खांब हटवण्यात आले होते.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (Vikram Sarabhai Space Center) एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या मशिनचे पार्ट वेगळे करता येत नाहीत. यासाठी मशिन मोठ्या ट्रकमधून आणण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान, इतकं वजन घेऊन 1700 किमी प्रवास आणि एक वर्षाचा काळ याबद्दल लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post