Adsense


जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता बीड शहरातील व्यापाऱ्यांच्या अँटिजेंन टेस्ट मध्ये तीन दिवसात तब्बल 366 पॉझिटिव्ह आढळून आले असून सोमवारी 131 पॉझिटिव्ह आले असल्याने चिंता वाढली आहे .


बीड शहरातील व्यापाऱ्यांची तीन दिवस अँटिजेंन टेस्ट करण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी 86 पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारी 137 व्यापारी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी करण्यात आलेल्या टेस्ट मध्ये माँ वैष्णो पॅलेस आणि बलभीम महाविद्यालयाच्या केंद्रावर जास्त रुग्ण आढळून आले .


बीड शहरात जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मंगळवार पासून 21 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे, या दरम्यान जे व्यापारी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातील तीव्र लक्षणे असलेल्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबासह संपर्कातील लोकांची देखील टेस्ट केली जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post