Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : अविचाराने वागून चालणार नाही. परिस्थितीनुरूप संयम बाळगावा. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. काही बदल त्रस्त करू शकतात. 


2. वृषभ : मुलांच्या आवडी निवडी पुरवाल. काही सवयी बदलून पहाव्यात. मेहनतीला पर्याय नाही. विलंबाने का होईना पण यश मिळेल.


3. मिथुन : अवास्तव खरेदीचा मोह टाळावा. मन काहीसे सैरभैर राहील. समोरील प्रत्येक गोष्टीत रममाण व्हाल. आज प्रेमाची अनुभूति येईल. 


4. कर्क : प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. आपली आकांक्षा पूर्ण होईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


5. सिंह : खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. जोडीदाराच्या वागण्याचा अचंबा वाटेल. धार्मिक कामात मन गुंतवाल. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. 


6. कन्या : सामाजिक बांधीलकी जपा. व्यावसायिक चढउताराकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. 


7. तूळ : अचानक धनलाभ संभवतो. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. 


8. वृश्चिक : नातेवाईकांकडून सुखद बातमी मिळेल. आनंददायी दिवस राहील. भागीदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. 


9. धनु : घरगुती वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.


10. मकर :  कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रकृतीची हेळसांड करू नका. मनोरंजनाकडे अधिक कल राहील. 


11. कुंभ : सार्वजनिक बाबीत सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. 


12. मीन : जोडीदाराच्या सहवासात रमाल. मनातील गैरसमज दूर होतील. आवडता छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post