Adsense


⚡ देशात कार्यक्षम आणि आक्रमक चाचणींद्वारे 3 कोटी कोविड चाचण्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 


💁‍♂️ मंत्रालयाची माहिती : सरकारी क्षेत्रातील 969 प्रयोगशाळेच्या आणि 500 खासगी प्रयोगशाळांमध्ये अशा एकूण 1,469 निदान करणाऱ्या प्रयोगशाळांच्या जोडल्या जाणाऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या राष्ट्रीय नेटवर्कमुळे हे शक्य झाले आहे.


👉 परिणाम : कोविड-19 मुळे बळी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आजअखेर भारताचा मृत्युदर हा जगात सर्वात कमी मृत्युदर दर असणाऱ्या काही देशाइतका म्हणजेच 1.93 टक्के इतका झाला आहे. 


👀 केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या एकत्रित  प्रयत्नांचा हा परिणाम आहे. 


📌 156 दिवस : 50 हजार मृत्यूसंख्या ओलांडायला अमेरिकेला 23 दिवस, ब्राझीलला 95 दिवस आणि मेक्सिकोला 141 दिवसांचा अवधी लागला तर या संख्येपर्यंत पोचण्यासाठी भारताला 156 दिवस लागले.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post