Adsenseशासन नियमाप्रमाणे जमीन न दिल्यास जीवाचे बरे वाईट करून घेण्याचा पवित्रा घेतलेल्या शहीद पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. १५) रोजी भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी अखेर त्यांचे आंदोलन मागे घेतले असल्याचे लेखी जाहीर केले आहे. 


२०१० साली ऑपरेशन रक्षक मध्ये शहीद झालेल्या थेरला ता. पाटोदा येथील तुकाराम राख यांच्या शहीद पत्नी भाग्यश्री राख यांनी शासन नियमाप्रमाणे २ हेक्टर जमीन मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे, त्यांच्या अर्जास अनेक दिवस उलटून देखील न्याय मिळत नसल्याची तक्रार करत आज (दि १५) रोजी त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 


याबद्दलची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क करून भाग्यश्री ताईंची आज (दि. १५)  भेट घेऊन चर्चेद्वारे विषय मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिले आहे, तसेच शहीद पत्नी भाग्यश्री राख यांनी ना. मुंडे यांच्या आश्वासनानंतर आपण आंदोलन मागे घेत असल्याचे कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post