Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


गेल्या अनेक महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने बैठे काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात पाठदुखीचा त्रास अनेकांना जाणवतो आहे. दरम्यान वेदनाशामक गोळ्या, इंजेक्शन घेण्याऐवजी नैसर्गिक उपाय कधीही चांगलेच ठरतात. त्यावर एक नजर... 


1. बॅक एक्सटेंशन : तुमचे हात छातीच्या बाजूला सरळ ठेवून हळु-हळु छाती वरच्या दिशेने उचला आणि श्वास आत घ्या. शरीराचा वरचा भाग जेवढा वर नेता येईल तेवढा न्या. या स्थितीत किमान 5 सेकंद रहा. आता आर्म्सची स्टेस रिलीज करा आणि श्वास बाहेर सोडत पूर्व स्थितीत या.


2. क्रॉस बॉडी शोल्डर स्ट्रेच : तुमच्या दुसर्‍या हाताने कोपर्‍याच्या वर हात पकडा. शरीर छातीकडे तोपर्यंत खेचा जोपर्यंत खांद्यांमध्ये ताण जाणवत नाही. या स्थितीत किमान 30 सेकंद राहा. नंतर पुन्हा हिच क्रिया दुसर्‍या बाजूने करा.


3. ट्वीस्ट : क्रॉस लेग्ज पोझीशनमध्ये बसून शरीर कमरेतून आपल्या पाठीकडे हळु-हळु फिरवा. डावा हात उजवा गुडघ्यावर ठेवा आणि आपला डावा खांदा पहा. 10 सेकंद केल्यानंतर सामान्य स्थितीत या. नंतर पुन्हा दुसर्‍या बाजूने करा.


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post