Adsense


 डिजिटल आरोग्य मिशन

आज 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची (एनडीएचएम) घोषणा केली. 


पंतप्रधान म्हणाले, की, आजपासून देशात एक मोठ्या अभियानाची सुरुवात होत आहे. हे अभियान राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन आहे. 


आता प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजार, तुम्हाला कोणत्या डॉक्टरांने कोणते औषध दिले, केव्हा दिले, तुमचा रिपोर्ट काय होता ही सर्व माहिती एका हेल्थ आयडीमध्ये समाविष्ट असेल.


🤓 एनडीएचएम कसे काम करणार? :


● हे अ‍ॅप डाउनलोड करून तुम्हाला आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. 

● यानंतर तुम्हाला एक हेल्थ आयडी मिळेल. 

● यात तुमचे उपचार, रिपोर्ट सर्व माहिती सेव्ह करावी लागेल, जेणेकरून याचा एक रिकॉर्ड तयार होईल.

● जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाल, त्यावेळी सर्व कागदपत्रे, रिपोर्ट घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. 

● डॉक्टर कोठेही बसून यूनिक आयडीद्वारे मेडिकल रिकॉर्ड पाहू शकतील. यावर रजिस्ट्रेशन करणे स्वैच्छिक असेल.

● याअंतर्गत डॉक्टरांच्या माहितीसह देशभरातील आरोग्य सेवांची माहिती अ‍ॅपवर उपलब्ध असेल. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post