Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.inशिरूर : पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाची अवस्था बिकट असल्याने प्रशासनाकडून या राज्य महामार्गाला मंजुरी प्राप्त झाली व 752 ई क्रमांकाचा राज्य महामार्ग प्रारंभ करण्यात आला होता परंतु शिरूर कासार तालुक्यांमध्ये या महामार्गाचे काम मावेजा अभावी शेतकऱ्यांनी खंडित केले होते शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून भूसंपादन व राज्य महामार्ग विभाग यांच्यामार्फत हा प्रश्न सध्या मार्गी लावला जाणार आहे यामुळे खंड पडलेल्या महामार्गाच्या कामाला पुन्हा जोमाने प्रारंभ होणार आहे. [Beed Reporter]

पैठण पंढरपूर या पालखी मार्गाचे काम शेत जमिनीचा मावेजा प्राप्त न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडित केले होते मागील वर्षांमध्ये या रस्त्याच्या कामाचा वेग मंद झाला होता परंतु उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग बीड यांच्या कार्याने या महामार्गावरील तालुक्यातील 9 गावातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या कार्यवाहीला वेग दिला जाणार असून या दरम्यान भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही खाजगी व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नये  [Beed News Paper]


असे प्रशासकीय विभागाकडून सांगण्यात आलेले आहे या महामार्गाचे भूसंपादन थेट खरेदी पद्धतीने होणार असल्याने काही अडचन किंवा तक्रार असल्यास कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद  म्हणजेच उपजिल्हाधिकारी भुसं. ल.पा.बीड यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (भूसं)  बीड यांनी केले आहे. [Beed Karyarmbh paper news]

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post