Adsense💁‍♂️ बीड, शिरूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करा


Beed News गेल्या दोन दिवसात झालेल्या अधिक पावसामुळे कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याबाबतच्या सूचना बीड विधानसभा  मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल विभागासह तहसीलदारांना दिले आहेत. Beed Ajacha Paper

बीड आणि शिरूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे पंचनामे तात्काळ करण्याबाबत आ.क्षीरसागरांनी (MLA Sandeep Kshirsagar) सूचना दिल्या. गेल्या दोन दिवसांच्या कालखंडात बीड, शिरूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. Beed reporter

बीड विधानसभा मतदारसंघात (Beed Assembly constituency) येत असलेल्या शिरूर आणि बीड तालुक्यात या पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. शेतातील कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

सदरच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे याबाबतच्या सूचना आ. संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांनी महसूल विभागासह तहसीलदारांना दिल्या आहेत. Batamya ajachya

यावर्षी शेतकर्‍यांनी कापूस आणि सोयाबीनचा मोठा पेरा केला आहे. पिकेही चांगली आली आहेत, परंतु पावसामुळे हे दोन्ही प्रमुख पिके जमीनदोस्त झाल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून येत आहेत. 

त्यानुसार महसूल मंडळनिहाय गावोगावी  बांधावर जावून प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे सांगत आ. क्षीरसागर यांनी शेतकर्‍यांना पंचनाम्याबाबत अडचणी येत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.  Beed News Paper

कार्यकर्त्यांनीही शेतकर्‍यांच्या पंचनाम्याबाबतच्या अडचणी तात्काळ सोडवण्याबाबत प्रशासनाला विनंती करावी, असे आ. संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. Beed BatamyPunchnama of crops of farmers in Beed, Shirur taluka


The heavy rains in the last two days have caused severe damage to cotton, soybean and other crops.

MLA Kshirsagar gave instructions for immediate panchnama of farmers in Beed and Shirur talukas. In the last two days, Beed, Shirur taluka and other parts of the district have received heavy rains.

Farmers in Shirur and Beed talukas coming under Beed assembly constituency have been hit hard by this rain. Cotton, soybean and other crops have been severely damaged.

Suggestions for immediate inquiry into the loss. Sandeep Kshirsagar has given the revenue to the tehsildar along with the department.

This year, farmers have sown large quantities of cotton and soybeans. Crops have also been good, but farmers are complaining that these two major crops have been destroyed due to rains.

Accordingly, the revenue board should go to the villages and inspect the dam and make a panchnama of the damage, he said. Kshirsagar said that if the farmers are facing any problem regarding the panchnama, they should contact the local NCP workers.

The activists should also request the administration to immediately resolve the issues related to the farmers' panchnama. Sandeep Kshirsagar has said.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post