Adsense

Beed News शेतकर्‍यापाठोपाठ मजूरही आत्महत्या करू लागले. गेल्या १५ वर्षापासून देशभरामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहे. केंद्र सरकार शेतीमालाला हमीभाव देण्यास अपयशी ठरल्याने शेतकरी आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या करू लागले. 

गेल्या वर्षभरामध्ये देशात शेतकर्‍यासह रोजंदारीवर काम करणार्‍या ४३ हजार मजुरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. Beed News Paper नापिकी, शेतीमालाला नसणारा भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची वेळोवेळी दिशाभूल केली जात आहे.

स्वामिनाथन आयोग लागू करू असे आश्‍वासन भाजप सरकारने दिलेले होते. मात्र भाजप सरकारला या आश्‍वासनाचा विसर पडला. beed reporter paper  गेल्या सहा वर्षांमध्ये शेतीमालाचे भाव प्रचंड प्रमाणात घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याने निराश होवून तो आत्महत्या करत आहे. त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असलेला मजूरही आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. Beed karyarambh paper गेल्या वर्षभरामध्ये शेतकर्‍यासह रोजंदारी क्षेत्रातील ४३ हजार मजुरांनी आत्महत्या केली आहे.Beed news paper याबाबतची राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोने केली आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आत्महत्यामध्ये पुढे देशात कृषी क्षेत्रातील व्यक्तींच्या आत्महत्येस महाराष्ट्र यंदाही पुढे आहे.

शेतकरी आणि शेतमजूरांच्या आत्महत्यांचे २०१९ मधील प्रमाण ३८.२ टक्के आहे. हेच प्रमाण कर्नाटकात १९.४ टक्के, आंध्रप्रदेश १० टक्के, मध्यप्रदेश ५ टक्के, छत्तीसगड आणि तेलंगणा प्रत्येकी ४.९ टक्के असे आहे. गेल्या वर्षभरात पश्‍चिम बंगाल, ओडीसा, बिहार, उत्तराखंड, मणिपूर, दिल्ली, पॉंडेचेरी येथे मात्र शेतकरी आत्महत्येचे प्रमाण शुन्य राहिलेले आहे. यंदा रोजंदारी कामगारांच्या आत्महत्येचे प्रमाणही २३.४ टक्के असे चिंताजनक राहिले आहे. तर गृहीणीच्या आत्महत्येचे प्रमाण १५.४ टक्के असल्याचे एनसीआरबीच्या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post