Adsense

 मैत्री म्हणजे ,

आयुष्यभराची साथ 

धडपडताना  सावरणारा हात 


मैत्री म्हणजे ,

रणरणत्या उन्हातला गारवा 

सुख दुःखातला प्रेमळ गोडवा 


मैत्री म्हणजे ,

निरपेक्ष निखळ नात 

निर्मळपणे दोन जीवांना जोडत 


मैत्री म्हणजे ,

प्रेमाचा किरण 

अमुल्य असे क्षण 


मैत्री म्हणजे ,

जन्मोजन्मीचे बंध 

सुंदर असे ऋणानुबंध - सुप्रिया नार्वेकर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post