Adsense

वैताग आलाय आयुष्याचा !!" | Blog Post by Suvarna Kundurkar


रेश्मा घरातील कसबस आवरून काही कामानिमित्त बाहेर पडली. रेश्माला दोन मूल तीही मोठी कॉलेज ला जातात. तिचा नवरा सुधीर त्याच नेहमी सारखं रुटीन चालू ऑफिस ला सकाळी जायचं आणि संद्याकाळी घरी यायचं. रेश्मा घरची कामे स्वतः कराची, कुठल्याही कामासाठी बाई नव्हती. त्यामुळे भांडी, कपडे, स्वयंपाक आणि घरातील आवरावरी तीलाच कराव लागायचं. त्याहून कोणी पाहुणे आले म्हणजे झालं.


रेश्मा ही सगळी काम करून दमून जायची शिवाय बाहेरची कामे जसं भाज्या आणणे, दळण करणे. मुलंही आवडीचं असेल तरच नीट जेवतात म्हणून स्वयंपाक पण त्यांना जे आवडेल त्याप्रमाणे करायची.... "पण तिला काय आवडत हे ती विसरून गेली ".


रेश्माची जवळ ची मैत्रीण बँकेत जॉब करायची. त्या दोघी कधी भेटल्या की रेश्मा मात्र म्हणायची तुझं खरंच चांगलं आहॆ. शिक्षणाचा उपयोग तू केला. माझं बघ मी कितीही दिवसभर राबलेना तरीही कोणी किंमत करत नाही उलटा टोमणा मात्र असतो......... "तुझं काय बरंय तू घरीच असते काही काम नसत ".


मैत्रीण रेश्माला म्हणते - हे बघ रेश्मा प्रत्येक वेळेस पैसे कमावण्यासाठी नको विचार करू,.. तुला ज्यात आवड आहॆ ते कर, तू तुझे छंद शोध, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. दिवस रात्र दुसऱ्यांना काय आवडेल ह्याचा विचार करते. एकदा तरी तुला काय आवडत तोही विचार कर. दिवस रात्र घरातील काम करून कोणी बक्षीस देणार नाही आणि मी म्हणतं नाही घरातली काम करू नको म्हणून,.... तू ती काम करून स्वतःसाठी रोजचा काही वेळ काढ मग बघ कसा बदल होतो तुझ्यात.


रेश्मा घरी आली रात्रीची जेवण झाली. किचन आवरून बाल्कनीत जाऊन बसली. मैत्रिणीने सांगितलेलं तिला खरंच पटलं. मी स्वतः माझं अस्तित्वच संपवलं असं वाटतंय. माझी आवड निवड , मी कॉलेज मध्ये असताना ग्राउंड वर मैत्रीण बरोबरचे खेळ, नेहमीच शाळेत, कॉलेज मध्ये पहिला नंबर मिळवणारी...... आज पूर्ण हरवल्या सारखी वाटते. आता वयाच्या 40शी ला वाटायला लागलं आपण काय केल. घर, नवरा आणि मूल सगळयांच नचुकता सगळं व्यवस्थित केल पण माझं काय? ......... उद्या मुलांची लग्न होतील आणि मी काय करणार ते त्यांच्या संसारात व्यस्त राहतील आणि मी परत एकटीच पडणार?


दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे घरातलं सगळं आवरत होती तेवढ्यात सुधीर म्हणाला चहा ठेव...... रेश्मा एकदम चिडली "हो ठेवते त्यासाठी झाला माझा जन्म, वैताग आलाय आयुष्याचा काय करणार". सुधीरला काही कळेनाच हिला काय झालं अचानक. त्याने जाऊन विचारलं काय झालं तुला बर वाटत नाही का?


रेश्मा - काही नाही झालं मला, एकदम ठणठणीत आहॆ मी. चहा सुधीरच्या हातात देऊन बेडरूम मध्ये कपाट आवरायला गेली.


रेश्मा मात्र नकारात्मक विचारनमध्ये जायला लागली. माझं पुढे कस होणार, जर सुधीरची नौकरी गेली तर घर कस चालणार आणि मीही काही कमवत नाही. रेश्मा आता शांत शांत राहू लागली. लहान सहान गोष्टींवर चिडायची. सुधीरला काही कळेना की काय होतंय रेश्माला.


सुधीरने रेश्माला डॉक्टरनंकडे न्यायच ठरवलं. एकदिवशी सुधीर आणि रेश्मा डॉक्टरांकडे गेले. रेश्माला त्यांनी तपासले.


डॉक्टर - तुम्हाला वाईट विचार येतात का सारखे, रात्री झोप लागत नाही का? , सारखं रडावस वाटत का?


रेश्मा - हो अहो डॉक्टर मला असच होतय बरेच दिवस झाले. मी आयुष्यात काही केल नाही ह्याचा पण मला खूप त्रास होतोय.


डॉक्टर - हे बघा जास्त विचार केल्याने काही फायदा होणार आहॆ का?...... हे स्वतःला शांत बसून विचारा. एवढा स्वतःला त्रास करून सहा महिण्यानी त्याचा उपयोग होणार आहॆ का? ह्याचाही विचार करा आणि आपल मन नेहमी बरोबर उत्तर देतो त्याच तुम्ही ऐका. रोज मॉर्निंग walk ला जा. स्वतःचे छंद जोपासा, असं म्हणून डॉक्टरांनी रेश्मा ला बाहेर बसायला सांगितलं. डॉक्टर सुधीर ला म्हणाले स्त्रीयांना 40 वयात हॉर्मोनल changes मुळे अशा प्रकारचे बदल स्वभावात होतात. त्यांना रात्रीची झोपेची गोळी आणि डिप्रेशन च्या औषधं लिहून देतो ते तुम्ही द्या त्यांना.


सुधीर रेश्माला घरी घेऊन येतो. जेवण झाल्यावर सुधीर रेश्माला औषधं देतो. त्यामुळे रेश्माला झोप चांगली लागते.


काही दिवसांनी रेश्माला बर वाटायला लागत. सुधीर तिच्या जवळ बसून सांगतो आता ती औषधं बंद कर कारण किती दिवस घेणार झोपेची गोळी त्यापेक्षा तू काहीतरी कर तुला जे आवडेल ते. तुझं एवढं शिक्षण झालं आहॆ हवं तर क्लासेस घे. नाहीतर दुसरं काहीतरी कर जसं तुला बर वाटेल तस.


रेश्मालाही वाटल जास्त औषधं बरी नाहीत. आणि सुधीरने सांगितलेली क्लाससेसची आयडिया चांगली वाटली. रेश्मा एका अकॅडमिमध्ये टीचर म्हणून जॉईन झाली. शिवाय काही घरातल्या कामासाठी बाई लावली. त्यामुळे बरेच ओझे कमी झाल्यासारखे वाटले रेश्माला


खूप स्त्रीया खरंच घरातल करता करता स्वतः मधली आवड निवड विसरून जातात. नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. नेहमीच घरातील काम करून कंटाळून जातात. स्वतःसाठी वेळ द्या.घर बसल्याही उदयोग करता येतो. कित्येक वर्ष दुसऱ्यासाठी जगला ""आता स्वतःसाठी जगा "".


लेख आवडल्यास share आणि कंमेंट करायला विसरू नका. लेख नावासोबत share करा............ ©सुवर्णा कुंदूरकर.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post