Adsense

चंद्रावरही मिळणार नेटवर्क


 चंद्रावरही मिळणार नेटवर्क


⚡ चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क उभे करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने फिनलंडची कंपनी नोकियाची निवड केली आहे. 

💁‍♂️ योजना : नासा भविष्यातील वसाहतीच्या दृष्टीने चंद्रावर सेल्युलर नेटवर्क प्रस्थापित करण्याची योजना आखत असून चंद्रावर मानवी वस्ती उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. 

👍 आर्मेटीस प्रोग्राम : २०२४ मध्ये माणसांना चंद्रावर नेण्याचे लक्ष्य नासाने आखले आहे. या योजनेला आर्मेटीस प्रोग्राम असे नाव दिले गेले आहे.

🤔 प्रयत्न : नोकियाकडून या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार नासा चंद्रावर माणसाना दीर्घकाळ वास्तव्य करता आले पाहिजे या दृष्टीने प्रयत्नशील आहे. 

🌔 सिस्टीम : नोकिया अंतराळात पहिली वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टीम २०२० अखेरीपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सुरु करणार आहे. 

💫 करार : टेक्सासच्या खासगी स्पेस क्राफ्ट डिझाईन कंपनी इन्टूएटीव्ह मशीन्स बरोबर करार करण्यात आला आहे.

📌 खुलासा : या कंपनीच्या सहकार्याने नोकिया त्यांची उपकरणे चंद्रावर नेणार आहे. तेथे ४ जी/ एलटीई कम्युनिकेशन स्थापन केले जाणार आहे. मात्र अंतिम लक्ष्य ५ जी नेटवर्कचे आहे असा खुलासा केला गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post