Adsense

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सामाईक परीक्षा आयोजित करण्यात आली असून बहुसंख्य उमेदवारांची प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना प्रवेशपत्र मिळण्यासाठी सर्वतोपरी तांत्रिक मदत मिळणे आवश्यक असून पोर्टलवर दिलेल्या नंबरवर कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने उमेदवारांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट पसरली असून तांत्रिक मदतीकरीता संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी नंबर चालू ठेवण्याची व्यवस्था सरकारने किंवा संबंधित विभागाने करावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.


तसेच सदरील भारतीच्या जाहिरातीमध्ये असे स्पष्ट न केल्याने एका-एका उमेदवारांनी चार-चार पदांसाठी प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा फीस भरून अर्ज केलेले असताना त्यांना मिळालेल्या प्रवेशपत्र मध्ये सर्व पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आली असून सर्व परीक्षेचा वेळ एकच दिला गेला असल्याने अशा उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उमेदवारांचे आर्थिक/ मानसिक/ करिअरचे अतोनात नुकसान होताना दिसत आहे. याचे सरकारला भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा संपूर्ण राज्यातील उमेदवारांच्या प्रतिक्रिया आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post