Adsenseबीड मतदारसंघातील 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांनी झेंडा लावला होता. आता सरपंचपदाच्या निवडणुकीत तब्बल 19 ग्रामपंचायतींवर जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. पहिल्या दिवशी सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीत 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच-उपसरपंच निवडून आले. तर आज दुसऱ्या दिवशी 15 पैकी 10 ग्रामपंचायतींवर जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. (Jaydutt Kshirsagar led Shivsena Sarpanch Upsarpanch at Gram Panchayat Election in Beed)


कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण सरपंच?


ब्रह्मगाव – सरपंचपदी वैष्णवी संदीप डावकर , उपसरपंचपदी संतोष बिडवे

पोखरी (मैदा) – सरपंचपदी अर्चना चंद्रकांत करांडे, उपसरपंचपदी कमलबाई बाळकृष्ण राठोड

माळसापुर – सरपंचपदी शीतल लहू खांडे, उपसरपंचपदी सुमंत राजेंद्र राऊत

मानेवाडी – सरपंचपदी सोनाली प्रदीप माने, उपसरपंचपदी सुखदेव चांगदेव माने

कोळवाडी – सरपंचपदी द्रौपदी अंकुश वाघमारे, उपसरपंचपदी प्रियांका तुळशीराम शिंदे

गुंधावाडी – सरपंचपद रिक्त, उपसरपंचपदी सविता नवनाथ माने

वंजारवाडी – सरपंचपदी पवळ सोनाली सर्जेराव, उपसरपंचपदी तांदळे विकास वैजनाथ

नागापूर (बु) – सरपंचपदी मुक्‍ताबाई सुखदेव ढोकणे, उपसरपंच आशा शंकर टेकाळे

कर्जनी – सरपंचपदी गायकवाड सखुबाई सुंदर, उपसरपंचपदी जाधव मुक्ता मल्हारी

वायभट वाडी – सरपंचपदी जलाबाई रामकिसन वायभट, उपसरपंचपदी गणेश हनुमान वायबट


(Jaydutt Kshirsagar led Shivsena Sarpanch Upsarpanch at Gram Panchayat Election in Beed)


राष्ट्रवादीचा दावा दिशाभूल करणारा


आज एकूण 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचपदाच्या निवडी होत्या. त्यापैकी 10 ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत कालच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीनंतर राष्ट्रवादीने 14 पैकी 9 ग्रामपंचायत ताब्यात आल्याचा दावा केला होता, मात्र तो दिशाभूल करणारा ठरला. आज झालेल्या निवडीमुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या 19 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच निवडून आले आहेत.


बीड मतदारसंघात शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांना धक्का बसला होता. त्यातच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post