Adsense

 
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आपल्या चित्रपटांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देतात. त्यामध्ये ‘सैराट’ चित्रपटात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर हे कलाकार असतील किंवा त्यांचे सहकलाकार म्हणून काम करणारे लंगड्या व सल्या म्हणून प्रसिद्ध असलेले तानाजी व अरबाज असतील. नागराज मंजुळे यांचा असाचं एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘फँड्री’ या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार यांच्यासह आणखी एक कलाकार आपली वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरली. (video | Glamorous look of ‘Fandry’ fame Rajeshwari Kharat)


ती म्हणजे चित्रपटातील शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे. शालू सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांसाठी शालू दररोज काही तरी वेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.


शालूची ही अदा पाहून शालूच्या चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी होण्याची वेळ आली आहे. नुकताच शालूने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडला असून तिचा हा डान्स सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post