AdsenseRed Magic 6 series चे दोन लेटेस्ट Gaming Smartphones लाँच करण्यात आले आहेत. या सीरीज अंतर्गत Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro स्मार्टफोनला बाजारात उतरवले आहे. दोन्ही फोनला स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. या लेटेस्ट सीरीजमध्ये कंपनीने हीटला कमी करण्यासाठी अॅक्टिव कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.

Red Magic 6 

हा फोन अँड्रॉयड ११ वर आधारित Red Magic OS 4.0 वर काम करतो. या फोनमध्ये 6.8. इंचाचा फुल एचडी प्लस (1,080x2,400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 165 हर्ट्ज़, सिंगल फिंगर टच सैम्पलिंग रेट 500 हर्ट्ज़, मल्टी-फिंगर टच सैम्पलिंग रेट 360 हर्टज आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 660 जीपीयूचा वापर केला आहे. सोबत 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 256 जीबी UFS3.1 स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5050 एमएएचची बॅटरी दिली आहे. 66 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनला 18 GB Ram प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत 42700 रुपये आहे. फोनच्या 12GB Ram  प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 46000 रुपये आहे. या फोनला कार्बन फायबर ब्लॅक मध्ये लाँच केले. टॉप व्हेरियंटमध्ये 12Gb Ram प्लस 128Gb Ram स्टोरेजच्या फोनची किंमत 49500 रुपये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post