नर्सची सटकली, डॉक्टरला कानाखाली लावली विडिओ पहा

  कोरोना संकटात डॉक्टर-नर्ससह (Doctor Nurse fight) सर्व आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे याच आरोग्य कर्मचाऱ्यांचा संयम सुटत असल्याचं दिसतंय. त्याचा परिणाम म्हणून डॉक्टर-नर्स एकमेकांवर हात उचलत आहेत. त्याची प्रचिती उत्तर प्रदेशात आली.यूपीतील रामपूर जिल्हा रुग्णालयात (Rampur Hospital) एका नर्सने डॉक्टरच्या कानशिलात लगावली. त्याबदल्यात डॉक्टरनेही नर्सवर हात उचलला. या सर्व प्रकाराने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, रामपूरच्या या रुग्णायलाय सर्व काही अलबेल नसल्याचं दिसतंय. इथे नेहमीच हाणामारीसारख्या घटना घडतात. मात्र डॉक्टर आणि नर्सच्या मारहाणीचा हा पहिलाच प्रकार असावा. स्टाफ नर्स आणि डॉक्टरची आधी वादावादी झाली. त्या वादाचं पर्यवसन थेट हाणामारीत झालं.