जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ आला समोर; जमिनीवरच ऑक्सीजन देऊन रुग्णांवर उपचार सुरू

 

बीडच्या जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार दररोज समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातील वेटिंग रूम मध्येच रुग्णांवर उपचार सुरू असल्याच धक्कादायक वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल आहे. 

या व्हिडिओमध्ये रुग्णालयात रुग्णांची होणारी गैरसोय दिसून येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे. जमिनीवरच रुग्णांवर ऑक्सिजन लावून उपचार सुरू असल्याचे यात स्पष्ट दिसत आहे. 

त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाहिये का असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय.