Adsense


Beed Latest News ilovebeed.com

उज्जैन शहरातील माधवनगर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे भाजप नेते जितेंद्र शिरे यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांता एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात ते खासदार अनिल फिरोजिया यांच्या भकडले आहेत. संतप्त कुटुंबीयांपुढे खासदार काहीच बोलू शकले नाही आणि त्यांना तिथून निघावं लागलं. या प्रकणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर खासदारांच्या समर्थकांनी माधव नगर हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली होती. आता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांविरोधात सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि कामात व्यत्यय आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे. ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी हॉस्पिटल बाहेर धरणे आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post