Adsense

 राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आता लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. हा इशारा आणखी कोणी गंभीरपणे घेतला की माहिती नाही पण मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून ‘स्टॉक’ची जमवाजमव सुरु केली आहे. (Crowd outside wine shops to buy alcohol stock in Mumbai amid fear of Lockdown)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिवसभरात व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. या सगळ्यानंतर लॉकडाऊनची छाया आणखी गडद झाली होती. त्यामुळे शनिवारी रात्री नालासोपाऱ्यात ‘वाईन शॉप’बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको म्हणून मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहर रांगा लावल्या होत्या. नालासोपारा पूर्व येथील नगीनदास पाडा परिसरातील हे दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.


एकीकडे वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या नालासोपारा शहरात लोकांनी दारुच्या दुकानाबाहेर तुंबड गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.

मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर अशाप्रकारे गर्दी आणि गोंधळ उडण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. मात्र, यावेळी महाराष्ट्रात कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींनी गेल्यावेळसारखी गत होऊ नये म्हणून अगोदरच स्टॉक खरेदी केला.


‘जिंदगी, जान उसके बाद काम’, नाट्य, चित्रपट क्षेत्रासह, मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा सरकारला पाठिंबा

राज्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 49 हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांचा हा आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल) लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसोबत बैठका घेतल्या. यामध्ये चित्रपट, नाट्य क्षेत्रासह मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत चर्चा केली. या चर्चेत सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला.


थिएटर्स चालक-मालकांचे सहकार्य

नितीन दातार म्हणाले, तात्पुरत्या रुग्णालयांसाठी थिएटर्स, त्याठिकाणी असलेली मुबलक जागांमध्ये काही प्रमाणात व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. काही ठिकाणी खूर्च्या काढूनही आवश्यकता वाटल्यास व्यवस्था करता येईल.


कमल गियानचंदानी म्हणाले, शासनाला पूर्ण सहकार्य करू. जनतेच्या राज्याच्या हितासाठी जो कोणता निर्णय घ्याल, त्याला पाठिंबाच राहील.


रोहित शेट्टी म्हणाले, सरकार जो निर्णय घेऊल, त्याच्या सोबत राहू. आपल्या प्रेक्षकांनाही त्रास होतो आहे. एकजुटीने शासनासोबत राहू. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. वेळोवेळी परिस्थितीचे पुनरावलोकनही केले जावे.


यावेळी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते राज्य शासनासोबत असून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post