तू बुधवार पेठेतील ** आहेस मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर मानसीच्या इन्स्टाग्राम फोटोवर गलिच्छ कमेंट

मानसी नाईकने नुकतंच एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये आपल्याला आलेल्या गलिच्छ अनुभवाबद्दल सांगितलं. एका युझरने मानसीच्या पोस्टवर “तू बुधवार पेठेतील ** आहेस” अशी कमेंट केली होती. “मला हसूही आलं आणि वाईटही वाटलं, की त्याने हे लिहिताना दोनदा विचारही नाही केला.” असं मानसी म्हणाली.


मानसी नाईकचे सडेतोड सवाल

‘बुधवार पेठेतील मी आहे हे समजायला, तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? दुसरी गोष्ट, बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात, तुम्हाला काय वाटतं, त्या तिथे का आहेत? त्या स्वतःचं पोट भरण्यासाठी ते काम करतात. त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे. त्या मेहनत करतात, हा विचार न करतात ती एक शिवी म्हणून अभिनेत्रीला वापरता’ असे म्हणत मानसीने त्याला झापलं.


मानसी नाईक काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. त्यावेळीही तिला लग्नावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. तुला मराठी मुलगा मिळाला नाही का? असा प्रश्न विचारुन तिला बेजार करण्यात आलं होतं.


शशांक केतकरही ट्रोल

शशांकच्या फेसबुक पेजवरील एका पोस्टवर यूझरने अश्लाघ्य भाषेत प्रश्न केला होता. शशांकचा पारा चांगलाच चढला आणि त्याने संबंधित व्यक्तीला सुनावत कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल, असा सल्ला दिला. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो” अशा शब्दात शशांकने त्याला खडसावलं.