कट मारल्या मानेवर केले वार



कट का मारला याचा जाब विचारल्यावरून दोघांनी एकाच्या मानेवर विळा मारून गंभीर जखमी केल्याची घटना १४ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

रोहिदास भिल व चंदू भिल रा दरेगाव ता अमळनेर हे दोघे १४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दरेगावला मोटरसायकलने जात असताना दरेंगाव फाट्याजवळ राजेश जयवंत महाले उर्फ सोनल घोडेवाला याने त्यांना कट मारल्याने ते खाली पडले व त्यांना जखम झाली म्हणून त्यांनी तांबेपुरा येथील शहाबान पिंजारी याला सांगितल्याने त्याने गोलू खाटीक ला पाठवून दोघांवर उपचार करून त्यांना रवाना केले. त्यांनतर गोलू व शहाबान दोघे सोनल घोडेवाल्याच्या घरी विचार पूस करायला गेले असता तिकडून सोनल व त्याचा मित्र रवींद्र उर्फ गंप्या रामभाऊ जाधव यांनी तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगून सोनल च्या प्रताप कॉलेज जवळील घोड्याच्या पत्र्याच्या शेड जवळ घेऊन गेला तेथे कट मारल्याचा जाब विचारला असता गंप्या जाधव याने शहाबान च्या मानेवर डाव्या बाजूला हातातील चार कापण्याचा विळा मारून गंभीर जखमी केले.शहाबान च्या मानेतून रक्त भळाभळा वाहू लागले तो जीव घेऊन पळाला. तेथून गोलू सोबत पोलीस स्टेशनला आला. त्यांनतर त्याला उपचारासाठी डॉ अनिल शिंदे यांच्याकडे दाखल केले. गुलाब पिंजारी यांच्या फिर्यादीवरून गँप्या व सोनल घोडेवाला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय राकेशसिंग परदेशी करीत आहेत.