अतिदक्षता विभागातील रुग्णाची खिडकीतून उडी मारून आत्महत्या● विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. 

● त्या रुग्णाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयातील खिडकीतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. 

● सोमवारी (२८ जून) पहाटे ही घटना घडली. प्रकाश उत्तम राठोड (वय ३६, रा. साकूड, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. 

● कर्जबाजारी पणाला कंटाळून प्रकाशने शनिवारी (२६ जून) विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. 

● तिथे त्याच्यावर पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. परंतु, सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास प्रकाशने बांधलेले हात कसेबसे मोकळे केले आणि हाताचे सलाईन काढून टाकून अतिदक्षता विभागाच्या बाहेर आले. 

● त्यानंतर समोरच असलेल्या डायलीसीस विभागातील शौचालयात तो गेला. शौचालयाच्या खिडकीचे गज काढून त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाली उडी मारली. 

● या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपस्थितांनी त्याला तातडीने अपघात विभागात दाखल केले असता तिथे उपचारा दरम्यान पहाटे ३ वाजता प्रकाशचा मृत्यू झाला. 

● याप्रकरणी प्रकाशच्या पत्नीच्या जबाबावरून अंबाजोगाई शहर  ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.