केंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान?● राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्याचे केंद्रीय स्थानी अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून देणारे स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या नंतर बीड जिल्ह्याला केंद्रात मंत्रिपद मिळेल का? यावर चर्चा होत असताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत खा. प्रितम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 

● प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले तर गेल्या सात दशकात केंद्रामध्ये मंत्री पद मिळवण्याचा चौथा मान प्रितम मुंडे यांच्याकडे जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. 

● बीड जिल्हा हा राजकीदृष्ट्या संवेदनशील असून राज्याच्या राजकारणात या जिल्ह्याचा दबदबा आहे. केंद्रीयस्तरावर स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचा दबदबा कायम होता. गेल्या सात दशकामध्ये बीड जिल्ह्यात केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ तीन लोकांना स्थान मिळाले आहे.