मी नेमकी कितवी पत्नी करुणा मुंडे केला मोठा खुलासा वाचा सविस्तर

 

न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी  करुणा मुंडे यांनी नुकताच फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांना ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला. न्यायालयातून माझे तोंड बंद करण्यात आले आहे. मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली आहेत असा आरोप त्यांनी केला.

करुणा मुंडे - मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते 

त्या म्हणाल्या, करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची कितवी पत्नी आहे हे विचारणाऱ्या लोकांना त्यांनी आवाहन केले की माझ्यावर कोर्टाचे असणारे निर्बंध हटवण्यास मुंडे यांना सांगा. ट्रोल करणाऱ्या लोकांना 5-6 बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो मात्र 25 वर्षांपासून एकनिष्ठ असणारी स्त्री जर वेश्या वाटत असेल तर तो तुमच्या दृष्टीचा दोष आहे हा माझा दोष नाही. तुमच्यामध्ये खरच हिम्मत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला सांगा की माझ्यावरील बोलण्याचे निर्बंध हटवा म्हणून.जर हे निर्बंध हटवले तर मी मीडियासमोर जाऊन सत्य सांगेन.

केंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान?

धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यांनी स्वतः याची कबुली दिली आहे. ज्या पद्धतीने इतरांच्या बायका त्यांच्या नवऱ्याचा पैसा खर्च करतात तसा मी सुद्धा करत असते. मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते हे जगजाहीर आहे असे सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुडे यांनी म्हटले आहे.कोणत्याही महिलेला ललकारू नका.लवकरच पुन्हा लाईव्ह येवून ट्रोल करणाऱ्या लोकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन असे त्यांनी खडसावले.