पॉ'र्नोग्राफी केसमध्ये शिल्पा शेट्टीला अजून क्लीन चिट नाहीपो'र्नोग्राफी केसमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अजून तरी क्लीन चिट देण्यात आलेली नसल्याचं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे.

पॉ'र्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाली असून या प्रकरणी पोलिसांकडून शिल्पाची चौकशीही करण्यात आली आहे.

या प्रकरणात सर्व शक्यता आणि धागेदोरे यांची पडताळणी केली जात आहे असे पोलिसांनी म्हटलंय.

या प्रकरणात झालेल्या आर्थिक व्यवहाराचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करण्यात आली आहे.