'कपिलधार' धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी 'कपिलधार' धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी

बीड जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू 

आहे. मांजरसुंबा, नेकनूर, केज यासह डोंगर परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने कपिलधार येथील धबधबा वाहू लागला आहे. 

बीडचा मुलगा धावतोय टोकियो ऑलम्पिकमध्ये!

दरम्यान या ठिकाणचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी जिल्हाभरातून पर्यटक गर्दीदेखील करत आहेत. 

अशातच काही तरुण हुल्लडबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास शंभर फुटांहुन हा धबधबा वाहतो आहे. 

केवळ फोटोसेशन करण्यासाठी तरुण थेट वरपर्यंत पोहोचले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही यंत्रणा नसल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी दिसून येते आहे. 

जीव धोक्यात घालून तरुण हुल्लडबाजी करताना दिसून येत आहे.