परळीत आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

परळीत आमिष दाखवून  महिलेवर बलात्कार


सोलापूर येथील रहिवासी असलेल्या 38 वर्षीय महिलेला परळी येथील एका चोवीस वर्षे तरुणाने फूस लावून नोकरी व घर बांधण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना परळी शहरात घडली.  या घटनेने परळी शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरून अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

याबाबत परळी शहर पोलिस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की, सोलापूर येथील एका 38 वर्षीय महिलेला पुण्याहून  परळी येथील रहिवासी गणेश बाबुअप्पा कोडी, (वय 24) वर्षे (रा. जंगम गल्ली, गणेशपार परळी याने आणले. सदरील महिलेला त्याने  तुला नौकरी लावून देतो, असे आमिष दाखवून  तिला परळीला घेऊन आला. परळीत आल्यानंतर रूम बघून देतो, असे म्हणून ता.19 रोजी रात्री व दि. 20  नोव्हेंबर 2021रोजी दुपारी बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला.  कोणास सांगितल्यास तुला परळीच्या बाहेरही जाऊ देणार नाही. तसेच येथेच मारुन टाकीन, अशी ठार मारण्याची धमकी दिली. सदरील महिलेच्या फिर्यादीवरून  परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.भार्गव सपकाळ, सपोनि.पेंटकर करत आहेत.