लग्नाला एक वर्ष झालंय, पण पत्नी अजून गरोदर राहिली नाहीप्रश्न : आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण माझी पत्नी अद्याप गरोदर राहिलेली नाही. किशोरवयात असताना दिवसातून अनेकदा मी हस्तमैथुन करायचो. याचा माझ्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे का?

उत्तर : तुमच्या क्षमतेवर परिणाम झालेला नाही. पण गर्भधारणेसाठी अधिक प्रभावी आणि अनुकूल अशा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये सेक्स करण्याचा प्रयत्न करावा. तसेच ज्या दिवशी तुमची पत्नी ओव्हुलेशन करत असेल त्या दिवशी सेक्स करण्याचा प्रयत्न करा. महिन्याचे नेमके हे दिवस जाणून घेण्याकरीता बाजारात ओव्हुलेशन स्ट्रिप्स उपलब्ध असतात. जर हा उपाय कामी येत नसेल तर तुम्ही मार्गदर्शनासाठी सेक्सोलॉजिस्टला भेट देऊ शकता.


pic - pixabay

text - mata