नगर-कल्याण रोडवर तीन वाहनांचा भीषण अपघात तीन जागीच ठार

नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील धोत्रे गावच्या शिवारात शनिवारी (दि.3)सकाळी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहे. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. नगर कल्याण महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास दोन कार आणि एक मालवाहतूक करणारा टेम्पो यांचा अपघात झाला आहे. या अपघातात मारुती इरटीगा कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्ती या मुंबईच्या कळंबोली भागातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
What's Your Reaction?






