वीस वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला
नवनाथ गोरे प्रतिनिधी बीड
बीड तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे आज दिनांक २४ वार शनिवार रोजी बीड तालुक्यांतील नागापूर खुर्द येथील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
वैभव विकास जगताप वय २० वर्ष असे मयत तरुणाचे नाव आहे मयत तरूणाने आज सकाळी नागापूर खुर्द शिवारातील शेतात सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्यांची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अशोक दराडे आणि त्यांचे सहकारी सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शविच्छेदन करण्यासाठीं बीड येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे वैभव यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजु शकले नाही मयत वैभव याच्या पश्चात आई. वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत
What's Your Reaction?