खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता अॅड. शशिकांत सावंत

खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता अॅड. शशिकांत सावंत

बीड-(प्रतिनिधी) बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब बीड यांनी खुणाच्या आरोपातून महादेव आसाराम रेडे यांची निर्दोष मुक्तता केली.

घटनेची हकिकत अशी की, दिनांक 06.02.2021 रोजी सुनील राधाकिसन बांगडे यांनी बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की, त्यांची बहीण नामे राधा हीचे लग्न इरगाव येथील महादेव रेडे यांच्यासोबत 10 वर्षांपूर्वी झाले होते व त्याची बहीण व मेव्हणा महादेव रेडे हे इरगाव तालुका गेवराई येथील कल्याण डरफे यांच्या औरंगपुर शिवारातील शेतात सालगडी म्हणून काम करत होते व त्यांच्या शेतात राहत होते व त्या ठिकाणी आरोपी महादेव रेडे यांनी राहत्या घरामध्ये तिचा निर्गुण खून केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती त्यास गुन्हा रजिस्टर नंबर 33/2021 कलम 302 अनव्ये गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासी अधिकारी यांनी एकूण 18 साक्षीदारांचे जबाब नोंदवून तसेच प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदारांचे कलम 164 प्रमाणे जबाब नोंदवून मा. न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते सदर दोषारोप पत्रास माननीय सत्र न्यायालयामध्ये आरोपीच्या विरोधात s.c.no. 110/2021 अन्वये आरोपीच्या विरोधात खटला चालवण्यात आला सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदारांचे जबाब माननीय न्यायालयामध्ये नोंदवण्यात आले तसेच तपासी अधिकारी यांचा जबाब माननीय न्यायालयामध्ये नोंदवण्यात आले परंतु आरोपीच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा आढळून आला नाही व बचाव पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला बचाव माननीय न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीची खुणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आरोपीच्या वतीने अँड. शशिकांत सावंत यांनी भक्कम बाजू मांडली त्यांना ऍड.हर्षल बहिर अँड. मुकुंद लोणकर अँड. अभिषेक बहिर अँड. माऊली डाके अँड. योगेश भांडवले अँड. प्रदीप दराडे यांनी सहकार्य केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow