गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई, 46 लाख 28 हजाराचा ऐवज जप्त

गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई, 46 लाख 28 हजाराचा ऐवज जप्त
गुटखा टेम्पो सह चालकाला पोलिसांनी ग्रामीण ठाण्यात आणले

बीड शहरालगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई करून टेम्पो सह गुटखा ताब्यात घेऊन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 46 लाख 28 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

बीड मांजरसुंबा दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी एक संशयित आयशर टेम्पो एमएच. 14, जेएल 863 या टेम्पोला अडवून चौकशी केली असता, त्या ठिकाणी त्यामध्ये गुटखा असल्याकारणाने तेथे तो न थांबता आणि टेम्पो पोलिसाच्या अंगावर घातला, आणि पोलिसांची दुचाकी क्रमांकएमएच.14, एक्यु. 4891 तिच्यावर टेम्पो घालून नुकसान केले. या प्रकरणात अंमलदार गणेश नवले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धुळे सोलापूर महामार्गावरील पाली येथील रोहिटे पेट्रोल पंपापासून तेथून तो फरार झाला. सदरील टेम्पो गेवराई दिशेने जात असल्याची खात्री होताच पोलिसांनी पाडळशिंगी टोल नाक्याजवळ महामार्ग पोलीस यांना सदर टेम्पो अडवण्याची सूचना केली. यावेळी पाडळसिंगी टोलनाक्यावर महामार्ग पोलीस काकडे परजणे यांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पोला ताब्यात घेतले. यावेळी गुटख्यासह टेम्पो आणि चालकाला ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी गणेश नवले यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.31 लाख रुपयांचा गुटखा, टेम्पो, मोबाईल असा 46 लाख 28 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नवले, नामदास चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow