बीडमध्ये दुधात भेसळ केल्याने अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई

बीडमध्ये दुधात भेसळ केल्याने अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई

बीड प्रतिनिधी:- जिल्हा दूध भेसळ समिती व अन्न व औषध प्रशासन, बीडकडून मे. माऊली मिल्क प्रॉडक्ट, बार्शी नाका, बीड येथे आज दि. 13 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधिताकाकडे सोडा हे भेसळकारी पदार्थ आढळून आला आणि १४० लिटर गाय दूध व १५० लिटर म्हशीचे दूध संशयाच्या आधारे नष्ट करण्यात आले. तसेच पेढी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे उल्लंघन करत असल्याने सामान्य जनहितार्थ पेढीमध्ये आढळून आलेल्या तुरटीची पूर्तता करे पर्यंत विक्री बंदचे आदेश देण्यात आले.

बार्शी नाका परिसरातील मे माऊली मिल्क प्रॉडक्ट येथे ही कारवाई एफडीए व जिल्हा दूध भेसळ समितीने केल्यानंतर तपासणी दरम्यान काढलेले नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. पुढील कारवाई नमुने अहवाल प्राप्त झाल्यावर करण्यात येईल. ही कारवाई अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, बीड व अन्न व औषध प्रशासनाचे औरंगाबाद विभाग आयुक्त अजित मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी केली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे नमुना सहायक उमेश कांबळे व दूध संकलन परियवेक्षक दत्तात्रेयकों दिराम थोरात व विस्तार अधिकारी संतोष मोराळे हे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow