मराठा आरक्षणासाठी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

 मुंबई प्रतिनिधी :- मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहइथे साडेसात वाजता ही बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर सर्व सदस्य उपस्थित असतील. या सर्वपक्षीय बैठकीला कोण कोण नेते निमंत्रित आहेत?

1) अशोक चव्हाण, काँग्रेस

2) अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता (ठाकरे गट)

3) विजयवडेट्टीवार विरोधी पक्षनेता (काँग्रेस)

4) उदयनराजे भोसले खासदार (भाजप )

5) नाना पटोले, काँग्रेस 

6) बाळासाहेब थोरात (काँग्रेस )

7) जयंत पाटील , राष्ट्रवादी 

8) राजेश टोपे, राष्ट्रवादी 

9) चंद्रशेखर बावनकुळे , भाजप 

10) जयंत पाटील , शेकाप

11) हितेंद्र ठाकूर,बहुजन विकास आघाडी 

12) कपिल पाटील, लोकभारती पक्ष 

13) विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

14) महादेव जानकर , राष्ट्रीय समाज पक्ष

15) बच्चू कडू , प्रहार जनशक्ती पक्ष 

16) राजू पाटील, मनसे 

17) रवी राणा, आमदार 

18) विनोद निकोले , मार्क्सवादी कम्युनिष्पक्ष 

19) संभाजी राजे भोसले, माजी खासदार 

20) प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी 

21) सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना 

22) जोगेंद्र कवाडे , पीपल्स रिपब्लिकन पक्ष 

23) राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

24) मुख्य सचिव 

25) प्रधान सचिव , विधी व न्याय विभाग 

यांना बैठकीला निमंत्रित केले आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मेडिकल उपचारांचा त्याग केला आहे. शिवाय ते कालपासून पाणीदेखील पीत नाहीत. सरकारचा दुसरा जीआरदेखील मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जातप्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण थांबणार नाही अशी भूमिका असल्याने यावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत सरकार चर्चा करणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow