अशोक कातखडे यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड
बीड प्रतिनिधी : निमगाव मा. येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक कातखडे यांची ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय निमगांव ( मा ) ता . शिरूर ( का ) जि . बीड येथील सामाजिक कार्यकर्त तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक महादेव कातखडे यांची दि . २९/०८/२०२३ रोजी ग्रामसभेत बिनविरोध तंटा मुक्ती अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . ग्रामपंचायत कार्यालय निमगाव मायंबा या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत केले जात आहे.
What's Your Reaction?