भारत राष्ट्र समितीच्या बैठकीस उपस्थित रहा! जिल्हा सहसमन्वयक कुलदीप करपे

भारत राष्ट्र समितीच्या बैठकीस उपस्थित रहा! जिल्हा सहसमन्वयक कुलदीप करपे

शासकीय विश्रामगृह बीड येथे भारत राष्ट्र समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा सह समन्वयक कुलदीप करपे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात अबकी बार किसान सरकार हा नारा देत व निर्धार करून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीने जोरदार मुसंडी मारली असून पहिल्या टप्प्यात विधानसभा मतदारसंघ निहाय ऑनलाइन सभासद नोंदणी केल्या नंतर भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रभारी मा. के. वामसीधर राव साहेब यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यातील सभासद नोंदणी ,पक्ष वाढीसाठी संघटनात्मक राजकीय ,सामाजिक बांधणी तसेच इतर महत्वाच्या विषयांवर विभागीय समन्वयक श्री.सोमनाथ थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शासकीय विश्रामगृहावर शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1:30 वाजता जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व विधानसभा समनव्यक , प्रमुख पदाधिकारी,जेष्ठ नेते, कार्यकर्ते व नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व नेते, कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक दिलिप गोरे,जिल्हा सह समन्वयक कुलदीप करपे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यात राजकीय बांधणीसाठी भारत राष्ट्र समितीने मोठे पाऊल उचलले असून सहा विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद गट , पंचायत समिती गणामध्ये संघटनात्मक राजकीय बांधणी करण्यासाठी जिल्ह्यातील सक्रिय पदाधिकाऱ्यांवर करून जबाबदारी निश्चित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेसमोर मोठा पर्याय बी.आर. एस. च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. टीप:-बातमीतील फोटो श्री. सोमनाथ थोरात (औरंगाबाद विभागीय समनव्यक, भारत राष्ट्र समिती )यांचा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow