काँग्रेसचे सुरेशचंद्र राजहंस यांना पुरस्कार

Latest Beed News in Marathi: ilovebeed.com covers all the latest Beed news in Marathi. Get daily Trending Beed News in Marathi language. बीड : ताज्या मराठी बातम्या at Ilovebeed.com

काँग्रेसचे सुरेशचंद्र राजहंस यांना पुरस्कार

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार काँग्रेसचे युवा नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे झुंजार प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस साहेब यांना जाहीर झाला आहे. 

०८ जुन २०२३ रोजी लातूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे, लातूर जिल्हा पोलिस अधिक्षक सोमय मुंढे, प्रेस संपादक सेवा संघाचे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगाव यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात योगदान देणा-या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजहंस यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सुरेशचंद्र राजहंस यांना दै. सकाळ समूहानेही मागील वर्षी *सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र* हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

"समाजाचे प्रश्न शासन स्तरावर मांडून त्यांना न्याय देण्याचा माझा सातत्याने प्रयत्न आहे व त्यासाठी मी नेहमी उपलब्ध असतो. लातूरच्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचा ॠणी आहे. यापुढेही माझे कार्य अधिक जोमाने करेन", अशी प्रतिक्रीया यावेळी सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केली.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow