सी सी टी एन एस मध्ये बीड जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम
CCTNS मध्ये राज्यातुन अव्वल येण्यात बीड पोलीसांची हॅट्रिक झाली असून एप्रिल 2023 मध्येही बीड पोलिसांनी राज्यातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे.
केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वाच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत NHB (Nation Crime Records Bureau) नवी दिल्ली यांचेकडून CCTNS (Crime and Criminal Tracking Network & Systems) ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत पोसण्याचे सर्व कामकाज संगणकीकृत ऑनलाईन चालते. Investigation Tracking System for sexual Offences) पोर्टलव्दारे जिल्हयात महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार संबंधाने दाखल गुन्हयांची निर्गती मुदतित होते असलेबाबा CCTNS प्रणालीव्दारे ऑनलाईन घेऊन प्रलंबित कामकाजा बाबत संबंधित पोस्टे ला सूचना देण्यात येतात.
अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाकडून CCTNS प्रणालीमा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील एकूण 53 घटकांच्या मासिक कामगिरीचे मुल्यांकन करून उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या घटकांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. सदरच्या कामगिरीधी पडताळणी करताना CCTNS प्रणालीमध्ये अद्ययावत केल्या जाणाऱ्या 18 फॉर्म (नोंदणी फॉर्म, तपास व अभियोग फॉर्म), महिला बालकावरील लैंगिक अत्याचार संबंधाने दाखल गुन्हयांची मुदतित निर्गती करुन अभिलेख CCTNS प्रणाली मध्ये अद्ययावत करण्याचे प्रमाण, सिटीझन पोर्टलवर नागरीकांकडून ऑनलाईन प्राप्त अर्ज तक्रारीची मुदतित निर्गती, दैनंदिन दाखल गुन्हयांचे FIR सिटीझन पोर्टलवर प्रकाशित करणे, CCTNS प्रणाली मधील उपलब्ध अभिलेखाचा वापर करून गुन्हे उघडकीस आनने आरोपी व संशईतावर दाखल पूर्व गुन्हयाचे तळणी करून गुन्हयांच्या स्वरुपानुसार त्यावर प्रतिबंधक कारवाई करणे अशा विविध कामगिरीचे मुल्यांकण करून प्रत्येक महिण्यास राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हयाची क्रमवारी जाहीर करण्यात येते.
हेही वाचा: मातृभूमी प्रतिष्ठानकडून बंडू खराटे सन्मानित
त्यासंबंधाने गुन्हे अन्वेषण विभाग (CID) महा राज्य पुणे व्दारे केलेल्या एप्रिल 20023 च्या मुल्यांकनात बीड जिल्हयाचा 342 पैकी 337 गुण प्राप्त करून राज्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे. यापूर्वी माहे फेब्रुवारी व मार्च 2023 च्या क्रमवारीमध्ये देखील बीड घटकाने प्रथम क्रमांक पटकावलेला होता CCTNS प्रणालीच्या उत्कृष्ठ कागिरीमध्ये सातत्य राखण्यात बीड पोलीसांना यश आलेले आहे सदर कामगीरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, पोनि श्री वाघ स्वागुशा, CCTNS सेल बीड अधिकारी सपोनि श्री. श्यामकुमार डोंगरे, अंमलदार पोह निलेश ठाकुर, मच्छिन्द्र मीडकर,
हेही वाचा: जर तुम्ही अचानक फ्रीजचं पाणी प्यायलात तर
चंद्रसेन राऊत यांनी विशेष परिश्रम घेऊन वेळोवेळी कामकाज अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली वेळोवेळी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेला पोलीस ठाण्यांचे CCTNS नोडल अंमलदार यांनी उत्तम प्रतिसाद देत अथक परिश्रम करून हे यश मिळवून बीड पोलीस दलाच्या यशात नवीन उच्चांक स्थापन केला आहे. सदरची कामगिरी ही CCTNS नोडल अंमलदार यांचे अथक परिश्रमाचे फलीत आहे.
What's Your Reaction?