अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बीड प्रतिनिधी:  लिंबागणेश येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते, सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील डवरी वस्ती याठिकाणी भीषण अपघात झाला. विजय प्रल्हाद विघ्ने वय ३५ वर्षं रा .वाघिरा ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवासी मोटारसायकलने लिंबागणेश येथुन वाघिरा गावाकडे जात असताना,अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन, घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लिंबागणेश येथील पोलिस चौकीचे अंमलदार संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे घटनास्थळी दाखल झाले होते. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow