प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना निलंबित करण्याची बिरसा फायटर्स ची मागणी

प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना निलंबित करण्याची बिरसा फायटर्स ची  मागणी

शहादा प्रतिनिधी: राजेंद्र हिवाळे प्रकल्प अधिकारी यावल यांची चौकशी करून निलंबन करा,अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी नाशिक आदिवासी विकास विभागचे आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे जिल्हा नंदूरबार प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री,सचिव, अपर आयुक्त, उपायुक्त यांनाही ईमेल द्वारे पाठवले आहे.

          निवेदनात म्हटले आहे की,राजेंद्रकुमार हिवाळे या प्रकल्प अधिकारी ने त्याच्या कार्यकाळात सर्व योजना फक्त पेपरवर राबविल्या आहेत व सर्व निधी हडप केला आहे. आदिवासी लाभार्थी यांना दुधाळ जनावरे वाटप या योजनेत लाभार्थी यांना जनावरे न देता सर्व निधी हडप केला आहे.कौशल्य विकास योजने अंतर्गत आदिवासी युवक युवतीना शिवणकाम ,विणकाम ,प्रशिक्षण व शिलाई मशीन देणे या योजनेत प्रशिक्षण व मशीन दिले नाही. फक्त एक मशीन घेऊन फक्त फोटो काढले आहेत.तरी या नमूद योजना व त्याच्या कार्यकाळात राबविलेल्या सर्व योजनाची चौकशी करून दोषी राजेंद्रकुमार हिवाळे याचे तात्काळ निलंबन करावे हि विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे नाशिक आदिवासी विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असा आंदोलनाचा इशारासुद्धा आदिवासी विकास विभाग प्रशासनाला बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलेला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow