ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ठेविदारांचा शिरूर कासार शहरात रास्ता रोको

ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ठेविदारांचा शिरूर कासार शहरात रास्ता रोको

बीड  प्रतिनिधी: ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी मिळवण्यासाठी शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकात आज गुरुवारी सकाळी दहा वाजता रस्ता रोको केले.

ज्ञानराधा मल्टीस्टेट ही पतसंस्था गेल्या काही महिन्यापासून बंद पडले आहे.ठेवीदारांच्या ठेवी देण्यात ती असमर्थ ठरलेली आहे. गेल्या काही दिवसापासून ठेवीदार आपल्या ठेवीची मागणी करत आहेत. मात्र त्यांना ठेवी दिल्या जात नाहीत. त्यामुळे आज अक्षरशः हतबल होऊन ठेवीदारांनी बीडच्या शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकात रास्ता रोको आंदोलन केले. व तात्काळ आमच्या ठेवी परत करा सदर ज्ञानराधा मल्टीस्टेटची एस आय टी मार्फत चौकशी करा, सर्व संचालक मंडळांना अटक करा, मल्टीस्टेट अध्यक्षाच्या प्रॉपर्टी जप्त करा, या मागणीसाठी ठेवीदार आज आक्रमक झाले होते .त्यांनी जिजामाता चौकात रास्ता रोको केला यावेळी बऱ्याच वेळ वाहतूक ठप्प करण्यात आली होती .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow